केडगाव हत्याकांड - आमदार जगताप पिता पुत्रांसह आमदार कर्डीलेंवर गुन्हा दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगावातील दुहेरी हत्याकांड प्रकरणी आमदार अरुण जगताप, संग्राम जगताप व शिवाजी कर्डिले यांच्यासह भानुदास कोतकर आणि त्यांचे पुत्र संदीप कोतकर यांच्यावर कटाचा गुन्हा दाखल झाला आहे. अन्य 25 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
विशाल कोतकर, औदूंबर कोतकर, बाळासाहेब कोतकर, संदीप गुंजाळ, रवी खोलम, अशोक कराळे, नवनाथ कराळे, मोहसीन शेख, विजय कराळे, रमेश कोतकर, शरद जाधव, संदीप गिर्हे, दादा येणारे, विनोद लगड, मनोज कराळे, मयूर राऊत, वैभव वाघ, शरद लगड, स्वप्नील पवार, संकेत लगड, बाबासाहेब कोतकर, राजू गंगड, अप्पा दिघे, बाबूराव कराळे यांच्यासह पाच ते सहा जणांनी कट, कारस्थान करून संजय कोतकर व वसंत ठुबे यांना गोळ्या घालून व कोयता तलवारीने मारल्याचे या फिर्यादित म्हटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी ३० जनांसह इतर ५ ते ६ जनांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

शिवसेनेचे उपनेते अनिलभैय्या राठोड, दक्षिण नगरचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक अनिल शिंदे, सचिन जाधव, सभागृह नेता गणेश कवडे, संजय शेंडगे, जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कार्ले, पंचायत समितीचे सभापती रामदास भोर, नगरसेवक योगीराज गाडे, विक्रम राठोड आदींनी घटनास्थळी गुन्हा दाखल होईपर्यंत तळ ठोकून होते. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
अनिलभैय्या राठोड यांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहे. केडगाव पोटनिवडुकीपासून येथे होत असलेल्या दहशतीची माहिती दिली जात आहे. त्यावर कारवाईची मागणी करत आहोत. तरी देखील पोलीस बघ्याच्याच भूमिकेत होते. या प्रकाराला जबाबदार असलेले पोलीस अधिकारी अक्षय शिंदे व अभय परमार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी त्यांनी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्याशी संपर्क साधून केली आहे. 

केडगावचे शिवसेना शहरउपप्रमुख कोतकर व ठुबे यांच्या हत्येप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, आ. कर्डिले यांच्यासह पाच जणांनी कट रचून हे हत्याकांड घडविण्यासाठी आरोपी गुंजाळ याला प्रेरित केल्याचे कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या पाच जणांविरुध्द 120 ब कलम लावण्यात आले आहे. त्यामुळे या घटनेला गंभीर राजकीय वळण लागले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.