तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मक्तापुर (नेवासा फाटा) येथे एका पस्तीस वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मक्तापुर येथील शिवाजी मच्छिंद्र वाल्हेकर असे या मयत तरुणाचे नाव आहे. मंगळवारी शिवाजी याचे घरामध्ये किरकोळ वाद झाला. दुपारी एक वाजता या रागाच्या भरात घरासमोर असलेल्या विहिरीत त्याने उडी घेतली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शिवाजी यांच्या पश्चात त्यांची वृद्ध आई धडपडत मागे धावली तो पर्यंत शिवाजी याने विहिरीत उडी घेतलेली होती. क्षणात सर्वत्र ही वार्ता सगळीकडे पसरल्याने विहिरीभोवती ग्रामस्थांची गर्दी झाली. विहिरीत गाळ असल्याने शिवाजी याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. 

रात्री उशिरापर्यंत तहसीलदार उमेश पाटील व पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांचे मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी बी. पी.साळवे, कामगार तलाठी सोपान गायकवाड, बी. एस. मलदोडे, व्ही. के. जाधव, मेजर रासकर तसेच पोलीस कर्मचारी गाळ व पाणी उपसण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
या विहिरीत पंधरा ते वीस फूट गाळ असल्याने शोध मोहीमेस उशीर झाला. याबाबत पोलीस पाटील आदेश साठे यांनी दिलेल्या खबरीवरून नेवासा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत शिवाजी यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.