लग्नासाठी माहेरहून पैसे आणण्यास नकार दिल्याने विवाहितेच्या अंगावर ॲसिड ओतून छळ.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- माहेरहून लग्नासाठी पैसे आणण्यास नकार दिल्याने भुतकरवाडी येथील विवाहितेच्या अंगावर ॲसिड टाकून छळ केल्याची घटना घडली असून या प्रकरणी पती, सासुसह व ननंदेवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या घटनेत विवाहित महिला जखमी झाली असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, भुतकरवाडी येथे राहत असलेला अमोल अर्जुन आठरे याने त्याची पत्नी प्रियंका (वय २७) हिला बहिणीच्या लग्नासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत होता. 

अमोल याची आई पुष्पा अर्जुन आठरे व बहिण प्रतिका अर्जुन आठरे हेही प्रियंका हिस त्रास देत होते. बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास यावरून घरात वाद झाले. प्रियंका हिने माहेरहून पैसे आणण्यास नकार दिल्याने पती व सासूने पकडून ननंद प्रतिका हिने प्रियंकाच्या अंगावर ॲसीड फेकले. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
यामुळे प्रियंकाच्या मांड्या व पायांवर गंभीर जखमा झाल्या असून या प्रकरणी प्रियंका आठरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासू व ननंद अशा तिघांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोसई देवडकर या करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.