काम सांगितल्याचा राग आल्याने संतप्त शिक्षिकेचा मुख्याध्यापिकेवर हल्ला

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मुख्याध्यापिकेने शालेय कामे सांगितल्याचा राग आल्याने संतप्त झालेल्या शिक्षिकेने मुख्याध्यापिकेस बेदम मारहाण केली. यात मुख्याध्यापिकेच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली असून डोक्याला १३ टाके पडले आहेत. ही घटना राहाता तालुक्यातील नांदुर्खी येथील एका शाळेत बुधवारी घडली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
नांदूर्खी गावच्या एका शाळेतील मुख्याध्यापिका यांनी उपशिक्षिकेस शालेय कामे व सूचना सांगून त्याबाबत विचारणा केली असता दोघींमध्ये शाब्दिक बाचाबाची व झटापट झाली. त्याचे पर्यावसन नंतर जोरदार हाणामारीत झाले. हा प्रकार चिमुकल्या विद्यार्थ्यांसमोरच घडला.

ज्ञानार्जनाचे धडे गिरवण्याऐवजी विद्यार्थ्यांना शिक्षिकांमधील हाणामारीचे 'धडे' मिळाल्याने पालक नाराज झाले आहेत. याप्रकरणी शिर्डी पोलिसांत रात्री उशिरापयंर्त गुन्हा दाखल झालेला नव्हता. तालुका शिक्षण विभागातील जबाबदार अधिकाऱ्यास या भांडणाबाबत बुधवार दि. ४ रोजी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून विचारणा केली असता हाणामारी व झालेल्या भांडणाबाबत त्या अनभिज्ञ होत्या. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
बुधवारी झालेल्‍या या हाणामारीची गुरूवारी उशिरापयंर्त शिर्डी पोलिसांत फिर्याद दाखल झालेली नव्हती. शिक्षण विभाग व येथील शिक्षणाधिकाऱ्यांकडे यापूर्वी आम्ही लेखी व तोंडी तक्रारी केल्या होत्या, असे म्हणने दोन्ही शिक्षिकांचे असून तशी चर्चाही शिक्षकांमध्ये दबक्या आवाजात आहे. अधिकाऱ्यांनी तक्रारींची वेळीच दखल का घेतली नाही? दखल घेतली असती, तर ही घटना घडली नसती, अशीही चर्चा होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.