साईबाबा शताब्दी महोत्सवास प्रधानमंत्री उपस्थित राहणार - खासदार लोखंडे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिर्डी येथे आयोजित होणा-या १७१ व्या साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवातील नाम सप्ताहाचे निमंत्रण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वीकारले असून या सप्ताहास प्रधानमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
श्री लोखंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज संसद भवन येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी १७१ व्या साईबाबा समाधी शताब्धी महोत्सवानिमीत्त दिनांक १६ ते २३ ऑगस्ट २०१८ दरम्यान शिर्डी येथे आयोजित सदगुरु गंगागिरी महाराज नाम सप्ताहाचे निमंत्रण प्रधानमंत्री यांना दिले.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
३० सदस्यीय शिष्टमंडळात अहमदनगर जिल्हयातील श्रीरामपूर तालुक्यातील सरलाबेट मठाचे महंत रामगिरी महाराज, साईबाबा संस्थान ट्रस्टचे सप्ताह समितीचे सदस्य, साईबाबांच्या समकालीन भक्तगणांचे वंशज आणि शिर्डीचे मूळ ग्रामस्थ आदिंचा समावेश होता.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.