भिडे गुरूजीवरून अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी, सेना भिडली !
अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सोशल मिडीयावरील भिडे गुरूजीच्या पोस्टवरून अहमदनगर शहरातील नालेगावात दांगट आणि मुदगल यांच्यात धुमश्चक्री झाली. आज सकाळी झालेल्या या घटनेमुळे नालेगावात तणाव निर्माण झाला. दांगट हे राष्ट्रवादीचे शहरजिल्हा उपाध्यक्ष असून मुदगल हे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. दोघांनीही एकमेकांविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न तसेच विनयभंगाच्या तक्रारी दिल्या असून पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
गत आठवड्यात या दोन्ही गटात नालेगावातच वादावादी झाली होती. त्यावेळी प्रतिष्ठितांनी मध्यस्थी करत वादावर पडटा टाकला. प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोहचले. पण आपसात वाद मिटल्याने पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. वाद वरकरणी मिटल्याचे दिसत असले तरी आतमधून धुमसणारी खदखद आज पुन्हा बाहेर पडली.
दांगट हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत. दत्तात्रय मुदगल हे शिवसेनेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती सुनीता मुदगल यांचे पती तथा माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे नालेगावात या दोन्ही गटात नेहमीच कुरबुरी होत असतात. आज मात्र त्याचे पर्यावसन जोरदार हाणामारीत झाले.
निलम गजेंद्र दांगट यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. लज्जास्पद वर्तन करून विनयभंग केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. झटापटीत महिलेच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्रही गहाळ झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. नालेगावातील कुंभार गल्लीतील दांगट यांच्याच घरात ही झटापट झाली. शिवसेनेचे माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल, त्यांची मुले भाऊ आणि अमर तसेच बाबासाहेब मुदगल, सचिन मुदगल हे सकाळी दहा वाजेच्या सुमारास घरात घुसले. त्यांनी पती कोठे आहे, अशी विचारणा केली. ते ऑफिसला गेल्याचे सांगितल्याचा राग आल्याने त्यांनी लज्जास्पद वर्तन केले.
यावेळी झालेल्या हाणामारी सोडविण्यासाठी देवीदास मुदगल हे मध्ये पडले. त्यांनाही लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. त्यात त्यांचे डोके फुटले असून संगीता मुदगल यांच्या गळ्यातील तीन तोळ्याचे मंगळसूत्र गहाळ झाले आहे. मुदगल यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गजेंद्र दांगट, अजय वाडेकर, अनमोल वाडेकर, बाबू रोहोकले, गौरव दांगट यांच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा
Ahmednagarlive24 चे App https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा
Ahmednagarlive24 चे App https://goo.gl/A1KePS .
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा
Ahmednagarlive24 चे App https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
दांगट हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत. दत्तात्रय मुदगल हे शिवसेनेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती सुनीता मुदगल यांचे पती तथा माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे नालेगावात या दोन्ही गटात नेहमीच कुरबुरी होत असतात. आज मात्र त्याचे पर्यावसन जोरदार हाणामारीत झाले.
निलम गजेंद्र दांगट यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. लज्जास्पद वर्तन करून विनयभंग केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. झटापटीत महिलेच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्रही गहाळ झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. नालेगावातील कुंभार गल्लीतील दांगट यांच्याच घरात ही झटापट झाली. शिवसेनेचे माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल, त्यांची मुले भाऊ आणि अमर तसेच बाबासाहेब मुदगल, सचिन मुदगल हे सकाळी दहा वाजेच्या सुमारास घरात घुसले. त्यांनी पती कोठे आहे, अशी विचारणा केली. ते ऑफिसला गेल्याचे सांगितल्याचा राग आल्याने त्यांनी लज्जास्पद वर्तन केले.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
या झटापटीत दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र गहाळ झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर आरोपींनी गजेंद्र दांगट यांना मारहाण केली. संगीता बाबासाहेब मुदगल यांनीही फिर्याद दिली आहे. त्या मुलीस क्लासवरून घेण्यासाठी जात असताना गजेंद्र दांगट यांच्या ऑफिससमोर बसलेल्या तरुणांनी संभाजी भिडे गुरूजींच्या पोस्टवरून टॉन्टींग सुरू केली. त्यातील एकाने रॉकेलची बाटली आणून ती अंगावर ओतली. जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.यावेळी झालेल्या हाणामारी सोडविण्यासाठी देवीदास मुदगल हे मध्ये पडले. त्यांनाही लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. त्यात त्यांचे डोके फुटले असून संगीता मुदगल यांच्या गळ्यातील तीन तोळ्याचे मंगळसूत्र गहाळ झाले आहे. मुदगल यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गजेंद्र दांगट, अजय वाडेकर, अनमोल वाडेकर, बाबू रोहोकले, गौरव दांगट यांच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,
Ahmednagarlive24 चे App https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
--------------------------------