कर्जबाजारीपणामुळे राहत्या घरी पंख्याला गळफास घेवून शेतकऱ्याची आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अकोले तालुक्‍यातील कळस बुद्रुक येथील भीमाशंकर रामभाऊ भुसारी (वय 48) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे मंगळवारी सायंकाळी राहत्या घरी पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
मृत भीमाशंकर यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.भीमाशंकर यांच्यावर सेंट्रल बॅंक व इतर वित्तीय संस्थांचे जवळपास आठ लाख रुपयांचे कर्ज आहे. उत्पन्न नाही आणि कर्जाचा आकडा फुगतो आहे. यामुळे चिंतेत असणाऱ्या भीमाशंकर यांनी आत्महत्या केली असल्याची कळस येथे चर्चा होती. 

याबाबत माहिती अशी की भीमाशंकर रामभाऊ भुसारी यांनी राहत्या घरी सहा वाजेच्या दरम्यान घरातील पंख्याला गळफास घेतल्याची घडना घडली. त्यांचा मुलगा शिवाजी याने चुलता बाळासाहेब यांना तातडीने कळवले. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
त्यानंतर त्यांना अकोले ग्रामीण रुग्णालयात दाखल केले गेले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्यांना मृत घोषित केले. ही घटना बाळासाहेब यांनी तातडीने अकोले पोलिस ठाण्यात कळवली. अकोले पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास मुख्य जमादार बी.बी.भोसले हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.