बाळासाहेब पवार यांच्या मृत्यूप्रकरणी 'त्या' सावकारांना अटक करण्याची मागणी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- प्रतिष्ठित उद्योजक बाळासाहेब पवार यांच्या आत्महत्येप्रकरणी दोषींना तातडीने अटक करण्याची मागणी सावकारी शोषणविरोधी जनआंदोलन समितीने केली. ब्लॅक गॅझेट प्रसिध्द करून पवार यांच्या दशक्रियाविधीच्या दिवशी (९ एप्रिल) दिल्लीगेट येथे ज्युरॅसिक सिटी घोषित करण्याचा इशाराही समितीने दिला. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
सकल मराठा मोर्चाच्या नियोजनातील आघाडीचे कार्यकर्ते, ओम उद्योग समूहाचे अध्यक्ष पवार यांनी ३१ मार्चला डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. पवार यांनी अनेकांना रोजगार दिला. अनेक संस्थांना त्यांनी अार्थिक मदत केली. व्यवसायासाठी अनेक बेकायदेशीर सावकारांनी दरमहा दहा ते पंधरा टक्क्यांनी चक्रवाढ व्याज दराने त्यांना पैसे दिले होते. 

पवार यांनी पैसे परत केले, तरीदेखील या सावकारांनी त्यांना छळले, त्यांच्या कुटुंबालाही वेठीस धरले. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पवार यांनी आठ सावकारांची नावे घेतली आहेत. या सावकारांमुळेच पवार यांना आत्महत्या करावी लागली. त्यामुळे संबंधित सावकारांच्या विरोधात खटले दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
कारवाई न झाल्यास समितीच्या वतीने ९ एप्रिलला सकाळी साडेदहा वाजता दिल्लीगेट येथे ब्लॅक गॅझेट प्रसिध्द करण्यात येणार आहे. सावकारांच्या शोषणामुळेच ज्युरासिक सिटी झाल्याचे या गॅझेटच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे अॅड. कारभारी गवळी यांनी दिली. यावेळी कॉम्रेड बाबा आरगडे, अशोक सब्बन, सुधीर भद्रे, प्रकाश थोरात आदी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.