संगमनेर मध्ये 8 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 54 वर्षीय नराधमाचा अत्याचार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पैशांचे आमिष दाखवून एका आठ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी, घारगाव पोलिसांनी काल दाखल झालेल्या गुन्ह्यातील ५४ वर्षाच्या आरोपीस अटक केली आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
घारगाव पोलिस ठाण्याच्या अखत्यारितील एका गावात, सुमारे पंधरा दिवसांपूर्वी घडलेली ही घटना, संबंधित पिडीत मुलीने रविवार ( ता. १ ) रोजी आपल्या आईला सांगितल्याने, तिला जबरदस्त मानसिक धक्का बसला.

त्यातून सावरल्याने पिडीतेच्या आईने काल घारगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत, यातील आरोपीने तिच्या अल्पवयीन मुलीला पैशांचे आमिष दाखवून सायंकाळी एका शेतातील गिन्नी गवताच्या आडोशाला नेऊन, अश्लिल कृत्य केले. ही घटना त्या मुलीने रविवारी घरी सांगितली. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
घारगाव पोलिसांनी संबंधित आरोपी विरुध्द गु.र.नं ४०/२०१८ नुसार भा.द.वि. कलम ३७६ (२) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला असून, यातील आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिलीप निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अन्सार इनामदार करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.