एप्रिल फूल व्यापाऱ्याला पडले महाग ! गुन्हा दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : तुमचा पती अपघातात ठार झाला, असा फोन करून एप्रिल फूल बनवणे एका व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले. व्यापारी लालशेठ चोरडिया यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. आजीनाथ फुंदे (डांगेवाडी शिवार) यांच्या पत्नीला चोरडिया यांनी फोन करून एप्रिल फूल करण्यासाठी तुमच्या पतीचा अपघातात मृत्यू झाला असे सांगितले. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
पत्नीने नातेवाईकांना बोलावून घेतले. खात्री केली असता हा प्रकार खोटा असल्याचे लक्षात आले. याचा जाब विचारण्यासाठी फुंदे यांची पत्नी व नातेवाईक चोरडियांच्या दुकानात गेले. त्यांच्यात बाचाबाची झाली. फुंदे यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून चोरडिया विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
दरम्यान, बाचाबाची झाल्यानंतर काहीकाळ पेठेतील दुकाने बंद झाली होती. पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर, नगरसेवक प्रसाद आव्हाड, नितीन गटानी, संदीप काकडे, फारूक शेख यांनी व्यापाऱ्यांना दिलासा देत दुकाने चालू करण्याचे आवाहन केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.