हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- माहेराहून हुंडयाचे पैसे आणण्यााठी पत्नीचा छळ करणाऱ्या पोलिसाविरुद्ध पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखला झाला आहे. माहेराहून पाच लाख रुपये घेऊन यावे, यासाठी पती विशाल झुंबरलाल थोरात हा पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करत असल्याची तक्रार तालुक्यातील पाडळी येथील एका विवाहितेने केली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
तक्रारदार महिलेचा पती सोनई पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. याबाबत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि.15 जाने. 2016 पासून पोलिस असलेला पती हा मला अल्टो गाडी घ्यावयाची असून, तू माहेराहून पाच लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी वारंवार करत आहे.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
या कारणावरून तो मला वेळोवेळी मारहाण करतो तसेच मानसिक त्रास देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पाथर्डी पोलिसांनी या संदर्भातील अहवाल जिल्हा पोलीस प्रमुखांना पाठवला आहे. पोलिसच हुंडयासाठी महिलेचा छळ करीत असल्याची घटना असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहेत. पुढील तपास पोलीस नाईक बी. पी. पालवे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.