श्रीपाद छिंदमला महाराष्ट्रातून हद्दपार करा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणारा भाजपमधून बडतर्फ केलेला माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला महाराष्ट्रातून हद्दपार करा, या मागणीसाठी नगरमध्ये मंगळवार (३ एप्रिल) रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली असून तसे पत्र सुद्धा कोतवाली पोलिस स्टेशनला देण्यात आले आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शिवरायांबद्दल अपशब्द उच्चारल्याप्रकरणी छिंदम याच्यावर गुन्हा दाखल असून सध्या तो जामीनावर बाहेर आहे. मात्र, छिंदम याला महाराष्ट्रातून हद्दपार करण्याची मागणी आता समोर आली असून त्यासाठी शिवप्रेमींच्या वतीने नगरमध्ये मोर्चाही काढण्यात येणार आहे.

मंगळवारी सकाळी अकरा वाजता माळीवाडा बसस्थानकाजवळ असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून हा मोर्चा सुरू होणार असून तो माळीवाडा वेस, पंचपीर चावडी, माणिक चौक, भिंगारवाला चौक, कापड बाजार, तेलीखुंट, चितळे रोडमार्गे चौपाटी कारंजा येथे येणार आहे.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
याठिकाणी मोर्चाचा समारोप करण्यात येणार असून त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे. शिवप्रेमींच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे पोलिसांना देण्यात आलेल्या पत्रामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच मोर्चा काढण्यासाठी परवानगी देण्याचीही विनंती करण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.