केडगाव दुहेरी हत्याकांड : नगरसेवक गिरवलेंच्या मृत्यूचा तपास सीआयडीकडे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव येथील दुहेरी हत्याकांडानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोडप्रकरणातील आरोपी नगरसेवक कैलास गिरवले यांचा मृत्यू पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे झाला असून पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी गिरवले यांच्या पत्नीसह नातेवाइकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. गिरवले यांचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाल्याने पोलिसांना हा गुन्हा दाखल करता येणार नाही अशी समजूत काढून त्यांच्या मृत्यूचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी देखील गिरवले यांच्या मृत्यूचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण पथकाकडे वर्ग करण्यात आला असून पुणे येथील पथक तपास करणार असल्याचे स्पष्ट केले. 7 एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास केडगाव येथील शाहूनगर भागात शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांची गोळ्या घालून व कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आमदार संग्राम जगताप यांना या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात चौकशीसाठी बोलविले.

त्या वेळी आ. जगताप यांना सोडून द्या अशी मागणी करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अधीक्षक कार्यालयाची मोडतोड केली. त्याप्रकरणी गिरवले यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर गिरवले यांना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली. 10 तारखेला न्यायालीय कोठडी दिल्यानंतर गिरवले यांना नाशिक मध्यवर्ती कारागृहात ठेवले. 

त्यानंतर 13 रोजी गिरवले यांना दारुबंदी कायदा कलमानुसार अटक केली. त्यानंतर 14 रोजी या गुन्ह्यात एक दिवसाची पोलीस कोठडी पोलिसांनी घेतली होती. त्यानंतर दि. 15 रोजी सकाळी 9.30 सुमारास छातीत दुखत असल्यामुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु तेथील डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात त्याच दिवशी दाखल करण्यात आले.

दि. 16 रोजी रात्री गिरवले यांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची तक्रार त्यांच्या भावाने पुणे येथील बंडगाईन पोलीस ठाण्यात दिली. तसेच याच पोलीस ठाण्यात गिरवले यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानुसार पोलीस महासंचालकांनी दिलेल्या आदेशानुसार या गिरवले यांच्या मृत्यूचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.