लग्नाचे कपडे घेण्यासाठी गेलेल्या तरूणाचा अपघातात मृत्यू, कुटुंबासह गावावर शोककळा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील टोलनाक्यावर अमोल दत्तात्रय घोरपडे (वय २५) या तरूणाचा सोमवारी रात्री अपघातात मृत्यू झाला. आई वडिलांना एकुलता एक असलेल्या अमोलचा गुरूवार १९ एप्रिलला विवाह होणार होता. त्या आधीच काळाने त्याच्यावर झडप घातल्यामुळे या घटनेमुळे कुटुंबासह गावावर शोककळा पसरली होती.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. टोल नाक्याजवळ याचठिकाणी महिन्यापूर्वी अस्तगाव येथील कैलास जेजूरकर यांचेही अपघाती निधन झाले होते. पिंपरी निर्मळ येथील अमोल घोरपडे लग्नाचे कपडे घेण्यासाठी सोमवारी नातेवाईकांसह नगरला गेला होता. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
बाभळेश्वरहून रात्री ११ च्या सुमारास दुचाकीवरुन येताना पिपंरी- निर्मळच्या टोल नाक्याजवळील गती रोधकाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी शवविच्छेदनानंतर घोरपडे वस्तीवर अंत्यसंस्कार पार पडले. पिंपरी निर्मळ ग्रामपंचायत सदस्य विष्णू घोरपडे यांचा तो पुतण्या होता. दरम्यान लोणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.