श्रीगोंद्यात लग्नाचे आमिष दाखवून मुलीने केले अल्पवयीन मुलाचे अपहरण !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथे लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. मात्र महिनापुर्वी घडलेल्या घटनेचा गुन्हा सोमवारी (१६ एप्रिल) दाखल करण्यात आला. याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
अल्पवयीन मुलाशी लग्न लावण्यासाठी नातेवाईकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे श्रीगोदा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून मुलाला १८ वर्षे पूर्ण आहेत, असा खोटा दाखला करुन घेतला. त्यानंतर मुलाला पळवून नेऊन आळंदी येथे १९ मार्च रोजी विवाह केला. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मुलीसह तिच्या घरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महावीर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.