शिवसैनिकांची हत्या काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजपच्या संगनमताने !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव येथील शिवसैनिकांची हत्या काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या संगनमताने झाली, असा आरोप शिवसेनेचे नेते तथा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केला. शिवसेनेचे उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांचा दशक्रिया विधी आटोपल्यानंतर शिंदे पत्रकार परिषदेत बोलत होते. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
राज्यमंत्री दादा भुसे, अनिल राठोड, आमदार विजय आैटी, महापौर सुरेखा कदम, संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे यावेळी उपस्थित होते. मंत्री शिंदे म्हणाले, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. पीडित कुटुंबीयांमागे शिवसेना खंबीरपणे उभी आहे. 

शिवसैनिकांवर दाखल झालेला ३०८ कलम मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिली नाही. आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात येणार आहे.पदाधिकाऱ्यांच्या हत्येनंतर शिवसैनिकांनी भावना व्यक्त केल्या, ती दंगल नव्हती, असे ते म्हणाले. 

तत्पूर्वी शिंदे यांनी कोतकर व ठुबे कुटुंबीयांचे सांत्वन केले. शिवसेना ही एक कुटुंब आहे. या कुटुंबातील सदस्यावर हल्ला म्हणजे शिवसेनेवर हल्ला आहे, असे शिंदे यांनी सांगितले. यावेळी कोतकर व ठुबे यांच्या पत्नीने मंत्र्यांसमोर आक्रोश केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.