वडील मोबाईलवर बोलत असताना मुलाचा स्विमिंग पुलमध्ये बुडून मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जतमधील प्रभातनगरमध्ये एका स्विमिंग पुलमध्ये 13 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. हा मुलगा पाठीवर बांधलेला फ्लोट अचानक सुटल्याने पाण्यात बुडाला. यावेळी त्याचे वडील मोबाईलवर बोलत असल्याने त्यांच्या लवकर लक्षात आले नाही. ही घटना रविवारी सायंकाळी घडली.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
कर्जतमधील प्रभातनगरमध्ये असणा-या मोरया स्विमिंग पुलमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त मोठ्या प्रमाणात लहान मुलांची पोहण्यासाठी गर्दी होत असते. रविवारी कोर्टात नोकरीला असलेले जाकीर पठाण हे आपला एकुलता एक मुलगा रेहान (13) याला पोहायला घेऊन आले होते. दुपारी साडे चार वाजता त्यांनी रेहानच्या पाठीला ड्रम बांधला व पोहण्यासाठी स्विमिंग पुलमध्ये सोडले. यावेळी 20 ते 30 मुले पोहत होती.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
पठाण यांना फोन आल्याने ते गोंधळामुळे बाजुला जाऊन बोलू लागले. तिकडे रेहान पाणी खोल असलेल्या जागी पोहचला आणि त्याच वेळी त्याच्या पाठीवरचा ड्रम निसटला व तो बुडू लागला पण हे कोणाच्याच लक्षात आले नाही. फोनवरचे बोलणे संपल्यानंतर पठाण पुन्हा स्विमिंग पुलकडे आले पण रेहान त्यांना कुठेच दिसला नाही. बरीच शोधाशोध केल्याने तो स्विमिंग पुलमध्येच आढळला. त्याला त्वरीत रुग्णालयात नेण्यात आले पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.