कर्जमाफीसाठी अर्ज केला नसेल तर चिंता नाही, मुदत आता 1 मे पर्यंत!

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अद्याप अर्जच केलेला नाही किंवा ज्यांचा अर्ज करायचं राहुन गेलं त्या शेतकऱ्यांना काळजी करण्याचं कारण नाही. कारण आता राज्य सरकारने कर्जमाफी योजनेची मुदत आणखी वाढवली आहे. आता राहिलेले शेतकरी 1 मे 2018 पर्यंत अर्ज करू शकतील.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
यापूर्वी योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दि.14 एप्रिल 2018 पर्यंत वाढविण्यात आली होती. मात्र पात्र शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये याकरिता मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा अर्ज करण्याची मुदत वाढविली आहे.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
वन टाईम सेटेलमेंन्ट योजनेसाठी यापूर्वीच 30 जून 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकरी कर्जमाफीची योजना जाहीर केल्यापासून सारखं त्याबाबत वाद होत आहेत. सुरवातीला यादींच्या घोळामुळं कर्जमाफीस उशीर झाला.नंतर बँकांनी घोळ घातला. तर विरोधकांनीही सरकारला वारंवार या प्रश्नावर घेरलं होतं. आता कर्जमाफीची मुदत आणखी वाढवून दिल्यानं शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.