शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मंत्र्याकडूनच मिळतेय अभय !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी शिवसेना उपनेते अनिल राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, महापौर सुरेखा कदम यांचे पती संभाजी कदम, नगरसेवक योगीराज गाडे यांच्यासह ६०० जणांविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापनाही करण्यात आली. मात्र, सहा दिवस उलटूनही अद्याप एकाही पदाधिकारी व कार्यकत्यावर कारवाई झालेली नाही. पोलिसांवर राजकीय दबाव असल्यामुळेच ही कारवाई होत नसल्याची चर्चा शहरात सुरू आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
केडगाव येथील दुहेरी हत्याकांडानंतर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिसरातील घरांवर व पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक केली होती. मृतदेह ताब्यात घेण्यास देखील त्यांनी विरोध केला. त्यामुळे हे मृतदेह मध्यरात्रीपर्यंत जागेवरच पडून होते. नगर- पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला, पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी कोतवालीचे सहायक फौजदार लक्ष्मण भीमाजी हंडाळ यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात शिवसेना उपनेते राठोड यांच्यासह ६०० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल असून या आरोपींवर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. 

या गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटीची (विशेष तपास पथक) स्थापना करण्यात आली. श्रीरामपूर येथील अप्पर पोलिस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित शिवथरे व कोतवालीचे पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांचा या पथकात समावेश आहे. तपासी अधिकारी म्हणून निरीक्षक रत्नपारखी काम पहात आहेत. समिती स्थापन करून देखील चार दिवस उलटले, तरी कारवाईचा मुहूर्त लागलेला नाही. विशेष म्हणजे गुन्हे दाखल असलेले शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते शहरात उजळ माथ्याने फिरत आहेत. पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मात्र धरपकड सुरू आहे. शिवसेनेतील या आरोपींना मात्र राजकीय दबावापोटी अभय देण्यात येत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. राज्यात युतीचे सरकार असून त्याचाच गैरवापर करत ही कारवाई रोखण्यात आली असल्याचे शहरात उघडपणे बोलले जात आहे.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
असे अाहेत आरोपी 
शिवसेना उपनेते अनिल राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक योगीराज गाडे, सचिन जाधव, विक्रम राठोड, दत्ता जाधव, विठ्ठल सातपुते, विजय पठारे, हर्षवर्धन कोतकर, अभिमन्यू राजू जाधव, संभाजी कदम, भय्या सातपुते, चंद्रकांत उजागरे, राजू पठारे, पिंटू मोढवे, रमेश परतानी, रावसाहेब नांगरे, विकी ऊर्फ विक्रम पाठक, संग्राम शेळके, विशाल गायकवाड, दीपक खैरे, नन्नू दौंडकर, शुभम बेंद्रे, विशाल वालकर, प्रशांत गायकवाड, मुकेश जोशी, बाळासाहेब बारस्कर, रणजित ठुबे, सचिन ठुबे, प्रफुल्ल साळुंके, गोविंद वर्मा, चेतन वर्मा, विकी भालेराव, नयन गायकवाड, सागर दळवी, सागर गायकवाड, सागर थोरात, अभिषेक भोसले, रमेश भाकरे महाराज, दीपक कांबळे, सचिन राऊत, दीपक धेंड, सुनील राऊत, रवी वाकळे, मदन आढाव, आदिनाथ राजू जाधव, मनोज चव्हाण, बंटी सातपुते, अंगद महानवर, अशोक दहिफळे, ऋषभ अंबाडे, प्रतीक अर्जुन गर्जे, सुशांत म्हस्के, तेजस गुंदेचा, कुणाल ऊर्फ बंटी खैरे, नरेश ऊर्फ गुड्डू भालेराव, लंकेश हरबा, उमेश काळे, अक्षय भांड, दत्ता नागापुरे, गिरीश शर्मा, नितीन चौबे, शुभम परदेशी, सुनील लालबोंद्रे, मुकेश गावडे, समीर सातपुते, अमोल येवले व इतर ६०० जण.

मंत्र्यांकडूनच मिळतंय अभय 
गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी नगरला भेट दिली. पोिलस प्रशासनाशी चर्चाही केली. दरम्यान, सेना कार्यकर्त्यांनी केलेल्या राडेबाजीवर मात्र, त्यांनी शब्दही काढला नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेना उपनेते राठोड यांच्यासह शिष्टमंडळाने केसरकर यांची मुंबई येथे भेट घेतली. गुन्हे दाखल असतानाही केसरकर यांनी त्यांना भेटही दिली. यावरूनच गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना मंत्र्यांकडूनच अभय मिळत असल्याचे स्पष्ट होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.