युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहाता येथील रामदास आसाराम निधाने (३५) या युवकाचा मृतदेह हॉटेल शिवनेरीच्या समोर मृतावस्थेत आढळून आल्याने राहाता शहरात खळबळ उडाली. ही घटना शुक्रवार रोजी दुपारी १२.४५ ते ३ वाजेच्या दरम्यान घडली. पोलिसांनी अज्ञात अारोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या घटनेची राहाता शहरात उलटसुलट चर्चा चालू आहे. राहाता पोलिसांनी प्रारंभी या घटनेची अकस्मात नोंद केली. मात्र, शनिवारी पोलिसांनी ३०२ कलमानुसार नोंद करून अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी मृत रामदासने त्याचा भाऊ प्रकाश आसाराम निधाने यास दुपारी १२.४५ वाजता मोबाइलवरुन फोन करून कोठे आहेस अशी विचारणा केली होती. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
मात्र, त्यानंतर दुपारी ४.३० वाजता मृत रामदासचे मित्र भाऊसाहेब (मुन्ना) सदाफळ व माजी नगराध्यक्ष साहेबरराव निधाने यांनी फोन करून रामदास हॉटेल शिवनेरी येथे बेशुध्द अवस्थेत पडलेला असल्याचे कळवले. यानंतर हॉटेल शिवनेरी येथे गेलो असता रामदासच्या अंगावर जखमा आढळून आल्या.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.