शहिदांच्या पत्नीला एसटीचा प्रवास आजीवन मोफत


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्यात शहिदांच्या पत्नीला एसटी बसने आजीवन मोफत प्रवास करता येणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी याबद्दल घोषणा केलीये.एसटीच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेअंतर्गत भारतीय सैन्यातील किंवा सुरक्षा बलातील कर्तव्यावर वीरमरण प्राप्त झालेल्या शहीद जवानांच्या वीर पत्नीस राज्य परिवहन मंडळाच्या सगळ्या प्रकारच्या बसेसमधून आजीवन मोफत प्रवास सवलत लागू करण्याचा निर्णय राज्य परिवहन मंडळातर्फे लागू करण्यात आलेला आहे.ही सवलत १ मे २०१८ पासून संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात येणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.