शिवसैनिकांचे अटकसत्र सुरू होणार ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव दुहेरी हत्याकांडनंतर शिवसैनिकांनी उग्ररुप धारण करुन रास्तारोकोसह पोलिस प्रशासन, रुग्णवाहिका, डॉक्टरांवर दगडफेक करुन मृतदेहाची हेळसांड केली. याप्रकरणी 600 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले. त्यानंतर शिवसैनिकांनी थेट गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे गुन्हे मागे घेण्याचे निवेदन दिले. मात्र अद्यापपर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हे मागे घेण्यासंदर्भात आदेश प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे गृहराज्यमंत्र्यांकडून शिवसैनिकांची दिशाभूल सुरू असून गुन्हे दाखल झालेल्यावर अटकेची कारवाई  होणार असल्याचे एका पोलिस अधिकार्‍याने सांगितले. 


-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
केडगाव दुहेरी हत्याकांड व पोलिस अधीक्षक कार्यालय हल्ला या दोन्ही प्रकरणात जमावाने तोडफोड करुन शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा आहे. एकीकडे पोलिस अधीक्षक कार्यालयातील हल्ला प्रकरणी अटकसत्र सुरू आहे. यामध्ये आजी आमदारांचा समावेश आहे. मात्र खून प्रकरणानंतरही पोलिसांवर हल्ला करुन शासकीय कामात अडथळा आणला. हे दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिस प्रशासनाला तपासात वेठीस धरण्याचा प्रकार घडला आहे. यामुळे पोलिस अधीक्षक कार्यालयातील हल्लाप्रकरणी आतापर्यंत 94 नावांचा उलगडा झाला असून त्यातील 49 जणांना अटक करण्यात आली आहे.

अजूनही सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नावे निष्पन्न होत आहे. सीसीटीव्ही दिसतात परंतु नावे माहित नाहीत असे असंख्य जणांचा शोध सुरू आहे. शहरातील तुरूंगही कमी पडत असल्याने शेजारच्या जिल्ह्यात आरोपींना हलविण्यात येत आहेत. परंतु दुसरीकडे शिवसैनिकांवर हल्लाप्रकरणी एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. त्यातच नगरचे शिवसेनेचे शिष्टमंडळ मंत्रालयात जाऊन गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांना भेटले. गुन्हे मागे घेण्याचे आश्‍वासनही दिले, परंतु आदेश काढलेला नाही. त्यामुळे गुन्हे दाखल असलेल्या शिवसैनिकांची केव्हाही धरपकड सुरू होणार आहे. त्यातच राज्याचे पोलिस महासंचालक सतिश माथूर यांनी नगर प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होणार नसल्याचे जाहिर केल्याने नगरचे पोलिस प्रशासन कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सुत्रांकडून समजली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.