नगरपालिका सभेत राष्ट्रवादी व सत्ताधारी भाजपात खडाजंगी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगरपालिकेचे जेसीबी मशीन व एलईडी दिव्यांच्या मुद्यावरून विरोधी राष्ट्रवादी व सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकामध्ये चांगलीच खडाजंगी झाली. ठेकेदार नगरसेवकांना पैसे देतो, असा आरोप राष्ट्रवादीने केला तर भाजपाने हा आरोप फेटाळला आहे. नगरपालिका सभागृहात नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सर्वसाधारण सभा पार पडली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, नगरसेवक प्रवीण राजगुरू, प्रसाद आव्हाड, बंडू बोरुडे, अनिल बोरुडे, मोहश बोरुडे, नामदेव लबडे, नगरसेविकामंगल कोकटे, सविता भापकर, आशिया शेख, सविता डोमकावळे, सुनीता बुचकूल, संगीता गटाणी, शारदा हंडाळ, दुर्गा भगत उपस्थित होते. 

नगरपालिकेचा जेसीबी मशीन गायब असल्याचा प्रश्न उपस्थित करून ही मशीन कुठे आहे? पालिकेचे मशीन असताना भाड्याने मशीन वापरून पालिकेत लाखो रुपयांची बिले गेल्या अनेक वर्षांपासून काढली जातात, हे संशयास्पद असल्याचे बंडू बोरुडे म्हणाले. जेसीबी मशीन नगर येथे दुरुस्तीसाठी पाठविल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यानंतर आमदार मोनिका राजळे यांनी दिलेल्या निधीतून सुरू असलेल्या एलईडी दिव्यांचे काम निकृष्ठ दर्जाचे आहे. 

ठेकेदार नगरसेवकांना पैसे वाटतो, याबाबत पुरावे सादर करूका, असा आरोप बंडू बोरुडे यांनी केला. या वेळी नगरसेवक अनिल बोरुडे यांनी बंडू बोरुडे यांचा आरोप नाकारत ज्यांनी पैसे घेतले त्यांचे नावे सांगा, सर्वांना बदमान करू नका, असे म्हणाले. मंगल कोकाटे व रमेश गोरे यांनीही बोरुडे यांचे म्हणणे मान्य नसल्याचे सांगितले. प्रसाद आव्हाड व दुर्गा भगत यांनी माझ्या प्रभागात एलईडी दिव्यांचे कम पूर्ण झाले नाही, असे सांगून पुन्हा विजेचे दिवे बसवा, असे सुचविले. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
नगरसेवक प्रवीण राजगुरू यांनीही एईडी दिव्यांचे काम निकृष्ठ असून, पूर्ण केले नसल्याची तक्रार केली. महेश बोरुडे यांनी आरोग्य समितीच्या सभापतींच्या घराशेजारीच पाण्याचे डबके साचल्याची तक्रार केली. अध्यक्ष मृत्युंजय गर्जे यांनी सर्व नगरसेवकांना तुम्ही विचार करून व अभ्यासपूर्वक बोला, केवळ नगरसेवक चांगले नाहीत. पालिका चांगले काम करीत नाही, असे म्हणून पालिकेला बदनाम करू नका. पारदर्शकता आणण्यासाठी आपण उपाय सुचवा, ते स्वीकारू,असे सांगितले. 

प्रवीण राजगुरू यांनी शेवगाव रस्त्याला माजी आमदार राजीव राजळे यांचे नाव देण्याची मागणी केली. राजीव राजळे हे खूप उंचीचे नेतृत्व होते, त्यांचे नाव रस्त्याला देण्यापेक्षा इतर चांगल्या ठिकाणी नाव देण्याची दुरुस्ती बंडू बोरुडे यांनी मांडली. आमच्या प्रभागात विजेचे चांगले कम झाले आहे. त्यामुळे ज्यांनी त्यांनी आमच्या प्रभागाची काळजी कोणी करण्याचे कारण नसल्याचे मंगल कोकाटे यांनी सांगितले. शहरात आरक्षित भूखंडाची मोजणी भूमी अभिलेख कार्यालयाकडून करून घेण्याचा ठराव करण्यात आला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.