पोलिस पतीच्या छळास कंटाळून पत्नीची आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पोलिस असलेल्या पतीने व त्याच्या कुटूंबियाने केलेल्या छळास कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसासह ५ जणांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिस पती ज्या पोलिस ठाण्यात कार्यरत आहे, त्याच पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुलीच्या दवाखान्याच्या खर्चासाठी माहेरहून पैसे आणावेत, या मागणीसाठी पोलिस नोकरीस असलेल्या पतीने व त्याच्या कुटुंबियांनी पत्नीचा छळ केला. या छळास कंटाळून पत्नीने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलिस पती विकास नानाभाऊ सातपुते, सासू शोभा नानाभाऊ सातपुते, दीर प्रकाश नानाभाऊ सातपुते, जाव प्रियंका प्रकाश सातपुते व मामे-सासरे सतीश गायकवाड यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
प्रणाली विकास सातपुते असे मृत पत्नीचे नाव असून, तिने बुधवारी रात्री (दि.११) रात्री ८.३० वा.च्या सुमारास राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. प्रणाली यांची आई विजयश्री दगडू उजागरे यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास व प्रणाली या दाम्पत्यास अडीच वर्षाची शौर्या नावाची मुलगी असून, ही मुलगी अपंग असल्या कारणास्तव तिच्या उपचारासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे वारंवार छळ केला जात होता. या छळास कंटाळून प्रणाली यांनी आपली जीवनयात्रा संपविली. या प्रकरणाचा पुढील तपास पोनि. प्रकाश पाटील हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.