आमदार जगताप पिता-पुत्रांविरुद्ध राजकीय आकसातून गुन्हे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आमदार संग्रामभैय्या जगताप व विधान परिषद सदस्य अरुणकाका जगताप यांना केडगाव येथे घडलेल्या दुर्देवी घटनेत राजकीय आकसापोटी अडकविण्यात आले आहे. या घटनेचा निषेध जीवनधारा प्रतिष्ठानने जिल्हा प्रशासनाला निवेदन देत केला. 


आमदार जगताप पिता-पुत्रांवरील खोटे गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तहसीलदार राजेंद्र थोटे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल लगड व पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन दिले. विरोधकांनी राजकीय सत्तेचा गैरवापर करुन, राजकीय आकसापोटी आमदार जगताप दुहींना अडकविले आहे. 

गुन्हा अधिक तीव्र स्वरूपाचा व्हावा यासाठीही राजकीय दबाव आणला जात आहे. आमदार जगताप यांच्या कार्य, कर्तृत्वाचा धसका घेवून शिवसेने या प्रकरणात त्यांचे नांव जाणून बुजून जोडल्याचेही निवेदनात म्हटले आहे. शिवसेना सत्तेचा घाणेरडा गैरवापर करत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.