हे राष्ट्रवादीची बदनामी करण्याचे षडयंत्र.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगावमधील शिवसैनिकांच्या हत्याकांडाशी राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही संबंध नाही. हे राष्ट्रवादीची बदनामी करण्याचे षडयंत्र आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या हत्याकांडप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “संग्राम जगताप यांचा या हत्येशी काहीही संबंध नाही. या प्रकरणात संग्राम जगताप यांना गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. तसेच या प्रकरणातील खरे आरोपी पोलिसांनी शोधून काढावेत,” असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

पोटनिवडणुकी दरम्यान शनिवारी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली. या हत्याकांडप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.