अनिल राठोड यांच्यासह ६०० जणांविरोधात गुन्हा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : सरकारी कामात अडथळा, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे, सार्वजनिक मालमत्ता विद्रुपिकरण, क्रिमिनल अमेंडमेंट अ‍ॅक्ट कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.केडगाव येथे शनिवारी (दि़ ७) शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हत्येनंतर रास्ता रोको, दगडफेक, पोलीस कर्मचारी, अधिका-यांना धक्काबुक्की व वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह सेनेचे नगरसेवक, पदाधिका-यांसह ६०० जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या प्रकरणी सहायक फौजदार लक्ष्मण हंडाळ यांनी सोमवारी रात्री फिर्याद दाखल केली. यामध्ये शिवसेनेचे उपनेते व माजी आमदार अनिल राठोड, शिवसेनचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, महापौर सुरेखा कदम यांचे पती संभाजी कदम, नगरसेवक सचिन जाधव, योगीराज गाडे, विक्रम राठोड यांच्यासह विठ्ठल सातपुते, विजय पठारे, हर्षवर्धन कोतकर, अभिमन्यू जाधव, भैय्या सातपुते (केबलवाला), चंद्रकांत उजागरे, राजू पठारे, पिंटू मोढवे, रमेश परतानी, राऊसाहेब नांगरे, विकी ऊर्फ विक्रम पाठक, संग्राम शेळके, विशाल गायकवाड, दीपक खैरे, नन्नू दौंडकर, शुभम बेद्रे, विशाल वालकर, प्रशांत गायकवाड, मुकेश जोशी, बाळासाहेब बारस्कर, रणजित ठुबे, सचिन ठुबे, प्रफुल्ल साळुंके, गोविंद वर्मा, चेतन वर्मा, विकी भालेराव, नयन गायकवाड, सागर दळवी, सागर गायकवाड, सागर थोरात, अभिषेक भोसले, रमेश भाकरे, दीपक कावळे, सचिन राऊत, दीपक धेंड, सुनील राऊत, रवी वाकळे, मदन आढाव, आदिनाथ राजू जाधव, मनोज चव्हाण, बंटी सातपुते, अंगद महानवर, अशोक दहिफळे, ऋषभ अंबाडे, प्रतीक गर्जे, सुशांत म्हस्के, तेजस गुंदेचा, कुणाल खैरे, नरेश ऊर्फ गुड्डू भालेराव, लंकेश हर्बा, उमेश काळे, अक्षय भांड, दत्ता नागापुरे, गिरीष शर्मा, नितीन चौबे, शुभम परदेशी, सुनील लालबोंद्रे, दत्ता जाधव, मुकेश गावडे, समीर सातपुते, अमोल येवले यांच्यासह ५०० ते ६०० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.