तपोवन रोड परिसरात टेम्पो चोरीचा प्रयत्न, दोघांविरुध्द गुन्हा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर-औरंगाबाद महामार्गावरील तपोवन रोड परिसरातील समतानगर येथे रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या टेम्पोच्या काचा फोडून दोघां जणांनी टेम्पो चोरुन नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी दि. २९ रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोघां जणाविरुध्द तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोपाल किशोरीलाल खुराणा (रा. तपोवनरोड, नगर) यांनी त्यांचे दोन टेम्पो घरासमोर रस्त्याच्या कडेला उभे केले असता गुरुवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास टेम्पोच्या काचा फुटल्याचा त्यांना आवाज आला. त्या आवाजाने खुराणा परिवारातील सदस्य जागे झाले व त्यांनी टेम्पोकडे पाहिले असता दोघे जण काचफोडून टेम्पो चोरुन नेण्याचा प्रयत्न करीत होते. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
तेव्हा खुराणा यांनी मोठमोठ्याने आवाज केला असता दोघे जण पळुन गेले. मात्र पळुन जाताना खुराणा यांनी त्या दोघांना ओळखल्याने याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात खुराणा यांच्या फिर्यादीवरन अर्जुन शिरसाठ व करण शिरसाठ (दोघे रा. पाईपलाईन हडको) यांच्याविरुध्द गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पो.ना. ए.के. पवार या करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.