कार-दुचाकीच्या अपघातात एक ठार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कार व दुचाकीच्या अपघातात एक ठार झाला. ही घटना पिंपळस शिवारात नगर-मनमाड महामार्गावर हॉटेल कोंडाणा जवळील कालव्याच्या पुलावर गुरुवारी पहाटे ४.३० वाजता घडली. प्रदीप त्रिंबक डोखे (३७, लोणी बु.) असे मृताचे नाव आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
तो श्री साईबाबा संस्थानच्या सुरक्षा विभागात सुपरवायझर होता. कार (एओ-३,एई-८७४६) वरील चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकीस (एमएच-१७ एएल ६८८५) धडक बसली. यात प्रदीप डोखे हा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी यास उपचारार्थ राहाता ग्रामीण रुग्णालायात नेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
संस्थानमधून लोणी येथील घरी जात असतांना पिंपळस शिवारात हा अपघात झाला. कार चालक शिर्डीकडे येत असतांना ताबा सुटल्याने कार रस्त्यामधील दुभाजक तोडून हॉटेल कोंडाण्याच्या दिशेला येऊन डोखे यांच्या मोटारसाईकलला धडकल्याने हा अपघात झाला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.