सरकारी वकिलावर विनयभंगाचा गुन्हा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव तालुक्यातील जिल्हा न्यायालयातील सरकारी वकील म्हणून काम पाहणारे अशोक वहाडणे यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
फिर्यादी पोलिस कर्मचारी महिला आपले न्यायालयीन कामकाजाच्या संदर्भात जिल्हा न्यायालय कोपरगाव येथे मंगळवारी (२७ मार्च) आपले कर्तव्य बजावत असताना आरोपी सरकारी वकील वहाडणे याने फिर्यादी महिला पोलिसाला तुझी ही न्यायालयात येण्याची वेळ आहे का? तुझ्या पी आय ला फोन लाव, असे अरेरावी केली. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
पोलिस ठाण्यात फोन करून या बाईला तुम्ही न्यायालयात पाठवत जाऊ नका, असे किती वेळा सांगितले आहे. बाई फुकटचा पगार घेते, असे सांगीतले. व महिला पोलिसाला शिवीगाळ करत तीच्या विनयभंगाचा प्रयत्न करून धक्का बुक्की केली. व जिल्हा न्यायालयाचे क्लार्क रूम मधून जबरदस्तीने बाहेर काढून दिले. याबाबत फिर्यादी महिला पोलिसाने दिलेल्या फिर्यादीवरून सरकारी वकील वहाडणे याच्या विरोधात विनयभंग व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.