श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथील रहिवासी असणारे सर्जेराव भानुदास खलाटे (वय ४० वर्षे) या शेतकऱ्याने आज (बुधवार दि.२८ रोजी) त्याच्या राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
मात्र खलाटे यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील रहिवासी शेतकरी सर्जेराव भानुदास खलाटे. यांनी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घराच्या पडवीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांनी आत्महत्या कोणत्या कारणावरून केली याचे कारण मात्र अस्पष्ट आहे. त्यांचे चुलत भाऊ शहाजी खलाटे यांनी दिलेल्या खबरीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.