श्रीगोंद्यातील तीन अनोळखी मृतदेहांपैकी एकाची ओळख पटली

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दोन दिवसांपूर्वी श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव शिवारात कुकडी कालव्याच्या चारी क्र १३ मध्ये दोन अनोळखी पुरुष जातीचे मृतदेह एकामागे एक वाहत आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यापैकी एक मृतदेह २५ ते ३० वर्षांच्या इसमाचा तर दुसरा ४० ते ४५ वर्षाच्या अनोळखी इसमाचा होता. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
त्यापैकी २५ ते ३० वर्षे वय असणाऱ्या मृतदेहाची ओळख पटवण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले आहे.तो मृतदेह नितीन रमेश वऱ्हाडे यांचा असून, त्यांचे मूळगाव पारगाव सुद्रीक आहे. ते चेंबूर येथे सुतारकाम करत होते.  याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील पारगाव येथील मूळचे रहिवासी असलेले राजू रमेश वऱ्हाडे. हे आढळगाव येथील छत्तीसेवस्ती येथे शेतीकामासाठी राहातात. 

त्यांचे चेंबूर येथे असलेले बंधू नितीन रमेश वऱ्हाडे हे काही दिवसांपूर्वी आढळगाव येथे त्यांना भेटायला आले होते. परंतु चार दिवसांपूर्वी ते अचानक गायब झाले. त्यामुळे सर्वत्र शोध घेऊनही ते न सापडल्यामुळे त्यांचे बंधू राजू वऱ्हाडे हे आज नितीन यांच्या मिसिंगची तक्रार नोंदवण्यासाठी आज बुधवार दि.२८ रोजी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आले. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
तेव्हा त्यांनी सांगितलेल्या वर्णनावरून पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी खात्री केली असता, त्या तीन मृतदेहापैकी एक राजू वऱ्हाडे यांचे बंधू नितीन वऱ्हाडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. मयत नितीन यांना पोहोता येत नसल्याचे त्यांचे बंधू राजू यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.