निळवंडेतील एकाचा विषारी औषध सेवन केल्याने मृत्यू

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे विषारी औषध सेवन केलेल्या एकाचा लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनिल गोरक्षनाथ पाचारणे (वय ३७) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथील गवंडी काम करणारे अनिल गोरक्षनाथ पाचारणे यांनी शुक्रवारी (दि. २३) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास विषारी औषध सेवन केले होते. त्यानंतर त्यांना उपचारार्थ तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारादरम्यान बुधवारी सकाळी सातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
मयत अनिल पाचारणे यांची घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची आहे. सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिर्डे व दिलीप पाचारणे यांनी मदतकार्य केले. प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या खबरीनुसार लोणी पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत अनिल पाचारणे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. निळवंडे येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.