खा. गांधींच्या घरासमोर राळेगणसिद्धी ग्रामस्थांच ठिय्या आंदोलन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थांनी आक्रमक होत खासदार दिलीप गांधी यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. अण्णा हजारे यांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्या अशी मागणी आंदोलकांनी केली. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे मागील सहा दिवसापासून दिल्ली येथील रामलीला मैदानावर उपोषणाला बसले आहेत. अण्णांच्या प्रत्येक आंदोलनात राळेगणसिद्धी परिवाराचे पाठबळ नेहमीच राहिले आहे. यावेळच्या आंदोलनात पहिल्या दिवसापासून राळेगण सिद्धि परिवाराने वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलने केली. 

दि.२८ मार्च रोजी राळेगण येथील ग्रामस्थ दुपारी तीनच्या सुमारास नगर मध्ये आले खासदार दिलीप गांधी यांच्या घरासमोर जाऊन ग्रामस्थांनी भाजप सरकार व दिलीप गांधी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तसेच अण्णा हजारे यांच्या मागण्या तात्काळ सरकारने मान्य कराव्यात अशी मागणी केली. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
यावेळी खासदार गांधी घरी नसल्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होत भर उन्हात गांधी यांच्या घरासमोर ठिय्या मांडत, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, हे भजन गात आंदोलन सुरू केले. या आंदोलनात राळेगणचे सरपंच लाभेश औटी, माजी सरपंच जयसिंग मापारी, नीलेश लंके, सबाजी गायकवाड, सोन्याबापु, विजय डोळ, पारनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वाघमारे आदीसह अण्णा हजारे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.