जामखेड-बीड रोडवर दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड-बीड रोडवर वडाच्या झाडीत वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संतोष बाबूराव महानवर (वय ३५, सध्या रा. चिंचवड, पुणे, मूळ रा. सावरगाव, ता. भूम, जि. उस्मानाबाद) असे अपघातात मरण पावलेल्याचे नाव आहे.
 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
जामखेड शहरापासून दोन किमीवरील हा अपघात झाला. आदर्श सुराणा व आनंद भोज यांनी या अपघाताची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना मोबाइलवरून दिली असता कोठारी यांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोचून जखमी संतोष महानवर यांना जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. 

वैद्यकीय अधिकारी डॉ. खराडे यांनी महानवर यांना मृत घोषित केले. संतोष महानवर यांच्या शिखात मिळालेल्या आधार कार्ड व ओळख पत्रावरून त्यांचे नाव संतोष बाबूराव महानवर असल्याचे समजते. संतोष हे आपल्या मूळ गावी आले होते. ते रात्री जामखेड तालुक्यातील नाणेवाडी येथे नातलगांना भेटण्यासाठी दुचाकीवरून जात असताना रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते जागीच मरण पावले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.