कोपरगावच्या गुन्हेगारांची कुंडलीच पोलिसांकडे.
अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगावमध्ये वाढलेली गुन्हेगारी व भुरट्या चोरांवर करडी नजर ठेवून गुन्हेगारी कायमची संपविण्यासाठी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीपकुमार पारेकर यांनी गुन्हेगारांची कुंडली तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या कुंडलीच्या माध्यमातून गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा
Ahmednagarlive24 चे App https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा
--------------------------------
गुन्हेगारावर वचक ठेवून ते भविष्यात कोणताही गुन्हा करणार नाहीत यासाठी पारेकर यांनी एकापेक्षा जास्त गुन्हे ज्यांच्यावर नोंद आहेत अशांची स्वतंत्र गुन्हेगारी कुंडली तयार केली आहे. त्या गुन्हेगाराने पुन्हा गुन्हा करू नये, पोलिसांची त्यांच्यावर करडी नजर रहावी यासाठी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या एका कर्मचाऱ्याकडे 5 गुन्हेगार दत्तक देण्यात आले आहेत.
त्या कर्मचाऱ्याने संबंधित गुन्हेगारांची माहिती प्रत्येक आठवड्याला पोलीस स्टेशनला लेखी पुराव्यासह, भेट दिलेले फोटो, गुन्हेगार व नातलगाच्या सह्यासह द्यावी लागेल. पोलीस स्टेशनला नवीन तयार केलेल्या नोंदणी वहीमध्ये गुन्हेगारांच्या फोटोसह शारीरिक, संपूर्ण परिचय, घरातील सर्व रक्ताचे नाते, मित्रपरिवार, नातलग, मालमत्ता, त्यांच्या कामाचे पूर्वी व सध्याच्या सहवासाचे ठिकाण, झालेल्या गुन्ह्यातील सजा, त्या गुन्ह्यातील सहआरोपी यांची सविस्तर माहिती, अशा गुन्हेगारांना ओळखतात त्या अधिकाऱ्यांचा संपूर्ण पत्ता, बक्कल नंबर यासह अनेक प्रकारची माहिती या नोंदणी वहीमध्ये ठेवण्यात आली आहे.
प्रत्येक आठवड्याला त्या गुन्हेगाराच्या घरी पोलीस धडकणार आहेत. त्यामुळे कोपरगावमध्ये गुन्हेगारी करणे आता महागात पडणार आहे. महिला-मुलींची छेडछाड करणारे, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणारे, दिवसा-रात्री भुरट्या चोऱ्या करणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू केली आहे. पोलीस निरीक्षक दिलीपकुमार पारेकर यांनी दंडुक्याबरोबर कायदेशीर कारवाईला जोरात सुरुवात केल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
पूर्वी केलेले गुन्हे असो किंवा वर्तमानातले गुन्हे, पोलीस त्यांचा कसून शोध घेण्यासाठी आता सज्ज झाले आहेत. पोलीस निरीक्षक पारेकर यांनी गुन्हेगारांची कुंडली तयार करण्यासाठी 10 स्वतंत्र वह्या केल्या आहेत. प्रत्येक वहीमध्ये 5 गुन्हेगारांची माहिती सविस्तर असेल. एका कर्मचाऱ्याकडे एक वही त्यातील 5 गुन्हेगारांचा इतिहास व वर्तमान आठवड्याला सादर करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
सध्या 40 ते 50 मोठे गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर अनेक गुन्हे आहेत. काही तडीपार आहेत. इतर किरकोळ गुन्हेगार शहरात वावरत आहेत. या सर्वांचा बंदोबस्त लवकरच करण्यात येणार आहे. बाहेरगावच्या गुन्हेगारांचे लागेबांधे असणारे काही गुन्हेगार आहेत.

त्यांचाही वेळीच बंदोबस्त केला जाणार आहे. रात्री-अपरात्री विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांवर पोलीस यंत्रणा पाळत ठेवून आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक पारेकर यांनी दिली आहे. हे सर्व काम वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने केले जाणार आहे. नागरिकांच्या रक्षणासाठी व गुन्हेगारांना धडा शिकविण्यासाठी पारेकर यांनी हा धाडसी निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,
Ahmednagarlive24 चे App https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
--------------------------------