तहसीलदार हल्ला प्रकरणी ५ जणांना अटक, ११ जण फरार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर तालुक्यातील कोहोकडी येथील कुकडी नदीपात्रात वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या पारनेरच्या तहसीलदार भारती सागरे व पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाळुतस्करांनी डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आतापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आली आहे. तर इतर ११ जण पसार आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
पारनेरच्या तहसीलदार भारती सागरे यांच्यावर वाळूतस्करांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर बुधवारी (दि.१३) रात्री उशीरा १६ जणांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर आरोपींचा शोध सुरू झाला. गुरूवारी (दि.१४) रोजी एलसीबीच्या पथकाने सुमारे ६ तासांच्या शोध मोहिमेनंतर ५ जणांना अटक केली आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
अटक करण्यात आलेल्यांमध्ये नरेश बिशू सहाणी (वय ५०, पोकलेन चालक, रा.दिलापूर, ता.मनोहाडी, जि.कटीयार,बिहार), पोकलेन मालक रमेश (रा.उपडी,कोल्हापूर), जेसीबी ड्रायव्हर अक्षय उंडेराय वाघमारे (वय २२, रा.हिम्पर्गा,ता.मुखेड,जि.नांदेड), जेसीबी मालक विठ्ठल कुरंदले (रा.अण्णापूर,ता.शिरूर), प्रशांत गोवर्धन साबळे (वय 24), तुषार दादाभाऊ दौंडकर (वय २३, दोघेही रा.घोटीमाळ, ता.शिरूर) यांचा समावेश आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.