राहुरीचे उपनगराध्यक्ष भुजाडी यांचा राजीनामा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-राहुरी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरुन आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला असून नवीन उपनगराध्यक्षपदाची निवड पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. पक्षश्रेष्ठी उपनगराध्यक्षपदी कोणाची निवड करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
नगरपालिकेची वर्षभरापूर्वी निवडणूक होऊन पालिकेची सत्ता माजी खासदार प्रसाद तनपुरे, सभापती अरुण तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षपदी प्रसाद शुगरचे अध्यक्ष प्राजक्त तनपुरे निवडून आले. पालिकेत सत्ताधारी जनसेवा मंडळाचे १६ सदस्य विजयी झाले होते. त्यावेळी पक्ष श्रेष्ठींनी उपनगराध्यक्षपद दरवर्षी बदलण्याचा निर्णय घेऊन प्रथम उपनगराध्यक्षपदी प्रभाग ९ मधून विजयी झालेल्या प्रकाश नानासाहेब भुजाडी यांची निवड केली होती.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
श्री. भुजाडी यांनी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांचे मार्गदर्शनाखाली उपनगराध्यक्ष म्हणून काम करताना जोगेश्वरी आखाडा येथील पिण्याचे पाण्याचा महत्त्वाच्या प्रश्नाबरोबर अनेक प्रश्न मार्गी लावले असून प्रभागाबरोबर गावातील विविध प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले आहे. नवीन उपनगराध्यक्ष पदासाठी अनेकजण इच्छुक असून शेवटी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो अंतिम असणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.