महाविद्यालयीन तरुणाची गळफास घेवून आत्महत्या


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  संगमनेर शहराजवळ असणाऱ्या घुलेवाडी येथे प्रोफेसर कॉलनीत राहणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि. ३० ऑगस्ट रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास घडली. जयेश शिवाजी औटी (वय-१८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. 

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, घुलेवाडी याठिकाणी प्रोफेसर कॉलनीत जयेश हा आपल्या आईसोबत राहत आहे. त्याचे वडील नोकरीनिमित्त बाहेरगावी असतात. बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास जयेशने घरातील छताला दोरीच्या साहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली.

याबाबत संदीप वाकचौरे यांनी दिलेल्या खबरीवरुन शहर पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल श्री.फटांगरे हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.