मोदी सरकारविरोधात अण्णा हजारेंचा एल्गार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सध्या केंद्र सरकार न्यू इंडिया, भ्रष्ट्राचारमुक्त भारताची निर्मिती, अशा घोषणा करून त्यांची प्रचंड जाहिरातबाजी करत आहे. मात्र, अशा जाहिरातबाजीने प्रश्न सुटणार नाही. केवळ पोस्टरबाजी करून महिला सुरक्षित होत नाहीत, की भ्रष्टाचार थांबत नाही. त्यासाठी कठोर कायदे करून त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे,' असे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. लोकपालसह अन्य मागण्यांसाठी दिल्लीत पुन्हा एकदा बेमुदत आंदोलन करण्याचा इशाराही हजारे यांनी या पत्रात दिला आहे.



काय लिहिलंय अण्णा हजारेंनी चिठ्ठीत ???
  • अण्णांनी मोदींना लिहिले आहे की ते लवकरच रामलीला मैदानावर आंदोलनाला बसणार आहेत. याची तारीखही लवकरच जाहीर करण्यात येईल.
  • अन्न सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जोपर्यंत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात येत नाहीत तोपर्यंत ते आंदोलन करण्यात येणार आहे. लोकायुक्तांच्या नियुक्तीवरही त्यांनी जोर दिला आहे.
  • अण्णांनी सरकारच्या बोलण्यात आणि वागण्यात खूपच अंतर असल्याचे म्हटले आहे.
  • मार्च महिन्यातही अण्णांनी चिठ्ठी लिहून मोदी सरकार भ्रष्ट्राचार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करत नसल्याचा आरोप लावला होता.
  • अण्णांनी याबाबीकडे लक्ष वेधले आहे की, ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे त्या ठिकाणी लोकायुक्तांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. 
  • केंद्र सरकारची तीन वर्षे पूर्ण झाली असून अजुनही सरकार भ्रष्ट्राचार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करत नसल्याचा आरोप त्यांनी लावला.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.