शेतकर्यांची फसवणुक होत असल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेचे उपोषण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन होउन तिन वर्ष झाले पण शेतकर्यांचे शोषण थांबविण्या बाबत सरकार निर्णय घेत नाही. संपुर्ण कर्जमुक्ती न देता निकष व अटी लावुन शेतकर्यांना कर्जमुक्ती पासुन वंचित ठेवण्याच्या व साखर, कांदा या शेतीमालाचे भाव पाडण्याच्या सरकारच्या कृतिचा निषेध करण्यासाठी, ३ सप्टेंबर, स्व. शरद जोशी यांच्या जयंतीदिनी राज्यव्यापी उपोषण करण्याचे आंदोलन होणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धीस दिली आहे.


जून महिन्यातील शेतकरी आंदोलना नंतर सरकारने कर्जमाफी जाहिर केली परंतू प्रत्यक्षात शेतकर्यांच्या पदरात काहीच पडले नाही. अॉनलाईन अर्ज भरण्याचा मनस्ताप तेवढा शेतकर्याना भोगावा लागत आहे. कर्जमाफीसाठी लावलेले निकष अन्यायकारी असुन ही शेतकर्यांची सरसकट फसवणुक आहे.

शेतकर्यांच्या कर्जबाजारीपणास सरकारचे धोरण जवाबदार आहे. दोन वर्ष कांदा उत्पादक शेतकरी संकटात असताना सरकारने कांदा उत्पादकांना वार्यावर सोडले होते. आता अंतरराष्ट्रिय बाजारात चांगले दर मिळत असताना ७०० डॉलर इतके प्रचंड किमान निर्यात मुल्य निश्चित करुन कांद्याची निर्यात बंद केली आहे तसेच कांद्याच्या साठ्यांवर सुद्धा मर्यादा घातल्या आहेत. कांद्याची आयात सुद्धा होण्याची शक्यता आहे. परिणामी कांद्याचे भाव पुन्हा गडगडले आहेत.

साखरेला सुद्धा चांगले दर मिळू लागले आहेत परंतू सरकारने साठ्यांवर मर्यादा तर घातली आहेच पण आयात करण्याचे सुद्धा संकेत दिले आहेत. सरकारच्या या हस्तक्षेपाच्या धोरणामुळेच शेती मलाला किफायतशीर भाव मिळत नाही व शेतकरीकर्ज बाजारी होतो. शेतकर्यां वरिल कर्जास सरकाचे धोरण जवाबदार आहे म्हणुन शेतकरी संघटना संपुर्ण कर्जमुक्तीचा आग्रह धरित आहे.

शेतकर्यांना दिड लाख रुपयां पर्यंत सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणा करुन राज्य सरकारने शेतकर्यांचे आंदोलन मोडुन काढले मात्र प्रत्यक्षात शेतकर्यांच्या पदरात काहीच पडले नाही. शासनाकडे पुरशी यंत्रणा नसताना, आॅनलाइन अर्ज भरण्यास सांगितले आहे. कामधंदा सोडुन, शेकडो रुपये खर्च कारावे लागत आहेत. शेतकरी रांगेत उभे राहुन व हेलपाटे मारुन त्रस्त झाले आहेत. शेतकर्यांची सर्व माहिती शासनाकडे आॅनलाइन उपलब्ध असताना शेतकर्यांना हा त्रास का दिला जातोय? कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया रद्द करावी अशी शेतकरी संघटनची मागणी आहे.

शेतकर्यांच्या कर्जमुक्ती बाबत एक प्रस्ताव शेतकरी संघटनेने दि. १. अॉगष्ट २०१७ रोजी जिल्हाधिकार्यां मार्फत शासनाला सादर केला होता. या प्रसतावात, शेतकर्यांना संपुर्ण कर्जमुक्त करणे, शेतीमाल आयात निर्याती वरिल सर्व नियंत्रण काढुन टाकणे, शेती विरोधी कायदे रद्द करणे, शेतीसाठी लागणारी विज, पाणी, रस्ते बाबत संरचना निर्माण करणे, ग्रामिण भागात प्रक्रिया उद्योग , गोदामे, शितगृह इथेनॉल निर्मिती इत्यादी शेती संलग्न व्यवसायांना चालना देणे व संपुर्ण कर्ज एकदम बेबाक करणे शक्य नसले तर १० वर्ष शेतीकर्ज वसुलीस स्थगिती देणे असे उपाय सुचविले होते. शासनाने वरिल पैकी कोणत्याही शेतकरी धार्जिणे निर्णय न घेता शेतकर्यांच्या लुटिचेच धोरण चालू ठेवले आहे. 

शासनाच्या या शेतकरी विरोधी कृतिचा निषेध करण्यासाठी दि. ३. सप्टेबर रोजी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी आंदोलन जाहिर केले आहे. नगर येथिल हुतात्तमा स्मारक, लाल टाकी येथे एक दिवसाचे उपोषण करण्याचे जाहिर केले आहे. ३ सप्टेंबर रोजी स्व. शरद जोशी यांची ८२वी जयंती आहे. 

या प्रसंगी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट, प. महाराष्ट्र महिल आघाडी अध्यक्षा सीमाताई नरोडे मार्गदर्शन करणार आहेत. उपोषणात शेतकर्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आसे आवाहन जिल्हाध्यक्ष (दक्षिण नगर) सचिन चोभे, जिल्हध्यक्ष (उत्तर नगर) बापुराव आढाव, जिल्हाध्यक्ष स्व.भा. प. विक्रम शेळके, जिल्हाध्यक्ष महिल अाघाडी इंदूताई अोहोळ, जिल्हा उपाध्यक्ष संजय तोरडमल, श्री. महादेव खामकर (युवा आघाडी जिल्हाध्यक) आदी पदाधिकार्यांनी केले आहे.

या आंदोलनात श्री. रमेश रेपाळे (श्रीगोंदा तालुकाध्यक्ष), श्री. लक्ष्मण अवसरे (जामखेड तालुकाध्यक्ष), श्री. अशोक जगताप (कर्जत तालुकाध्यक्ष), श्री. शरद जोशी (शेवगाव तालुकाध्यक्ष), श्री. त्रिंबक भदगले (नेवासा तालुकाध्यक्ष), श्री. जालिंदर कराड (पाथर्डी तालुकाध्यक्ष), डॉ. संजय कुलकर्णी (राहुरी तालुकाध्यक्ष), श्री. नामदेवराव धनवटे (राहाता तालुकाध्यक्ष), श्री. संदीप गेरंगे (नगर तालुकाध्यक्ष), मार्गदर्शक श्री. कारभारी कणसे, श्री. आंबादास राऊत, श्री. सुधाकर देशमुख, श्री. नारायण पोटभरे, श्री. अनिल भुजबळ, श्री. रामदास वांगणे, श्री. आंबादास चव्हाण, श्री. महादेव गवळी आदी उपस्थित राहणार आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.