जाचक अटींमुळे कांदा अनुदानापासून शेतकरी वंचित


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्य सरकारने 2016 च्या जुलै व ऑगस्ट महिन्यात मार्केटला कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना प्रतिकिलो एक रूपया अनुदान जाहीर करून संबंधित शेतकऱ्यांना बाजार समित्यांकडे प्रस्ताव देण्यास सांगितले होते. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी प्रस्तावही दाखल केले होते.
सरकारने मागील महिन्यात आलेल्या प्रस्तावांचे जिल्हा उपनिंबधकांमार्फत लेखपाल नियुक्‍त करून सदर प्रस्तावांचे लेखापरीक्षण करून शासन निर्णयाप्रमाणे पात्र व अपात्र अशा याद्या तयार करून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर झालेले अनुदान वर्ग केले. 

परंतु पारनेर तालुक्‍यासह नगर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना कांदापट्टी मुलाच्या नावाने व सातबारा वडिलांच्या नावे असल्याच्या क्षुल्लक कारणामुळे अपात्र ठरवत अनुदानापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे तालुक्‍यातील बहिरोबावाडी येथील किरण पोपट व्यवहारे या शेतकऱ्याने माझे अनुदान जमिनीचा सातबारा वडिलांच्या नावाने असल्यानेच न मिळाल्याची सोमवारी पारनेरचे सहाय्यक निंबधक सूर्यवंशी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. 

पारनेर तालुक्‍यात एकूण 206 शेतकरी सरकारच्या जाचक नियमांमुळे अनुदानापासून वंचित राहिले आहेत. असे जिल्ह्यातही हजारो शेतकरी आहेत. या सर्व अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल व राज्य सरकारने शासन निर्णयात बदल करावा यासाठी सरकारकडे मागणी करणार असल्याचे भूमिपूत्र शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्‍ते अनिल देठे यांनी म्हटले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.