संगमनेरमध्ये माजी सैनिकाला तरुणांकडून बेदम मारहाण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव ते सिन्नर या हायवेवर एक माजी सैनिक पेट्रोलिंग करत असतांना दोघा तरुणांनी त्यांची गाडी अडवून त्याला शिविगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवार दि.२९ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास हॉटेल स्टेटस्समोर घडली आहे. या माजी सैनिकाने पोलिसांना फोन करुनही कोणीच घटनास्थळी आले नाही.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बाळासाहेब शिवाजी ढगे (वय ४०,रा.खांडगाव) हे माजी सैनिक खेड - सिन्नर एक्स्प्रेस रस्त्यावर पेट्रोलिंगचे काम करत आहेत. नेहमीप्रमाणे ते मंगळवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या गुंजाळवाडी शिवारातील हॉटेल स्टेटस्समोर पेट्रोलिंगचे काम करत असतांना दीपक रेवजी गुंजाळ व गणेश दशरथ गुंजाळ (दोघे रा.गुंजाळवाडी) या दोघांनी मोटारसायकलवरुन येवून बाळासाहेब ढगे व इतर कर्मचाऱ्यांना काही कारण नसतांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली व शर्टाची कॉलरही पकडून खाली ढकलून दिले.

लाकडी दांडक्याने ढगे यांना मारहाण केली. या मारहाणीत ढगे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनी घटनेची माहिती शहर पोलिसांना सांगूनही पोलीस घटनास्थळी आले नाही. शेवटी त्यांनी शहर पोलीस ठाणे गाठून वरील दोघांविरूद्ध फिर्याद दिली. त्यामुळे शहर पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरुन दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. दत्तात्रय गोरे हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.