निंबोडी दुर्घटनेतील मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना 5 लाख रुपयांची मदत.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अतिवृष्टीमुळे अहमदनगर तालुक्यातील निंबोडी जिल्हा परिषदेची शाळा पडून झालेल्या दुर्घटनेत मृत तीन विदयार्थ्यांच्या पालकांना आर्थिक मदत म्हणून राज्य शासनामार्फत 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च शासनामार्फत करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

                                 

पालकमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

या जिल्हा परिषदेच्या शाळेचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश अहमदनगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले असल्याचेही श्री. तावडे यांनी स्पष्ट केले. अहमदनगर तालुक्यातील निंबोडी येथील या जिल्हा परिषदेच्या शाळेचे 1998- 1999दरम्यान बांधकाम झालेले आहे. 

काल या शाळेची जुनी इमारत सलग दोन दिवसापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे कोसळली़. यात तीन विदयार्थी मृत पावले तर सुमारे 35 विद्यार्थी या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. जखमी विदयार्थ्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून, या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य शासनामार्फत करण्यात येणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.