घरगुती वादातून पत्नीवर गोळी झाडणाऱ्या नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :घरगुती वादातून पत्नीवर गोळी झाडणाऱ्या नवऱ्याविरोधात कोपरगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२७ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास आरोपी सुनील विश्वनाथ रक्‍ताटे याने पत्नी माधुरी हिच्याबरोबर झालेल्या वादातून कोणत्यातरी अग्नीशस्त्राने फायर करून गोळी झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. 


फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

गोळी झाडल्यानंतर स्वत:वर काही संशय येवू नये म्हणून पत्नी माधुरी हिस उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेला. अशी फिर्याद रवींद्र अंबादास कदम (रा. पाचचारी, मालखेड रोड, रवंदे) यांनी कोपरगाव शहर पोलिसांत दिली आहे.या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी सुनील विश्वनाथ रक्‍ताटे यांच्याविरोधात गु.र.नं. १०५/१७, भादंवी कलम ३०७ आर्म ॲक्‍ट ३/२५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि पी. वाय. कादरी हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.