श्रीरामपूर-बाभळेश्वर रस्त्यावर पोलिस व दरोडेखोरांमध्ये सिनेस्टाईल गोळीबार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपूर ते बाभळेश्वर रस्त्यावर सोमवारी पहाटे दहा ते बारा जणांच्या टोळक्याने रस्त्यावरील वाहनांची लुटमार करत धुडगूस घातला. यावेळी लुटारूंनी केलेल्या मारहाणीत पोलिसासह सहा जण जखमी झाले. त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

दरम्यानच्या काळात लोणी पोलिसांनी नाकाबंदी करत त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी गावठी कट्ट्यातून गोळीबार करत पळ काढला. त्यानंतर सिनेस्टाईल पाठलाग करत पोलिसांनी पिंप्रीनिर्मळजवळ लुटारुंच्या दिशेने केलेल्या गोळीबारामध्ये एक आरोपी जखमी झाल्याने दुचाकीवरील तिघांपैकी दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. 

याप्रकरणी श्रीरामपूरला एक व लोणी पोलिसांत चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, श्रीरामपूरला पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याने अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.