निंबोडी जिल्हापरिषद शाळेचे छत कोसळले,३ जणांचा मृत्यू .

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर तालुक्यातील निंबोडी जिल्हा परिषद शाळेचे छत पावसामुळे कोसळले आहे, ३५ मुले आणि शिक्षक अडकले होते, यातील ३ मुलांचा दुर्दैवी म्रुत्यु झाला असून ही घटना आज साडे चारच्या सुमारास घडली.जेसीबीच्या साह्याने अडकलेल्या काही मुलांना बाहेर काढण्यात आले आहे. 


नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेच्या या शाळेची इमारती जुनी झाली होती. गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे या शाळेची इमारती कोसळली. त्यामुळे सुमारे ३५ विद्यार्थी शाळेत अडकले असल्याची माहिती जिल्हा परिषदेतून सांगण्यात आली. 

दरम्यान घटना घडल्याची माहिती आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील आणि उपाध्यक्षा राजश्री घुले तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 

अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु असून जखमी मुलांवर तेथेच प्राथमिक उपचार केले जात आहे. तर काही मुलांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले असून काहींवर खासगी रूग्णालयात उपचार चालू आहेत. काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.