अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे राहुरी, नेवासा तालुक्यातील मुळा नदीकाठावरील अनेक गाव क्षेत्रातील कपाशी, सोयाबीन, घास याह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत असतानाच आ. बाळासाहेब मुरुकटे यांनी स्वत: प्रांताधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी आदींना बरोबर घेत खेडले परमानंद, शिरेगाव आदी क्षेत्रात प्रत्यक्ष शेतावर जावून पहणी करून अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट (शंभर टक्के) पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.


फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

गेल्या शनिवार, रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ओढ्या-नाल्यांना पाणी आले. अनेक शेतांचे तळे झाले. अनेकांच्या कपाशी, सोयाबीन, घास, मका आदी पिकात पाणी साचल्याने व ते बाहेर पडण्यास मार्ग नसल्याने ही पिके उपळून जळून गेली. अद्यापही काही ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचलेले असल्याने हातातोंडाशी आलेला खरीपाचा माल यामुळे वाया गेला.

यातून काही प्रमाणात का होईना पण भरपाई मिळावी यासाठी या भागातील शेतकरी मागणी करणार तोच आ. मुरकुटे यांनी खेडले परमानंद येथील शेतकऱ्यांच्या शेतात भेट देवून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले. 

यावेळी प्रांताधिकारी आंबेकर, तहसीलदार उमेश पाटील, तालुका कृषी अधिकारी बिबवे, सर्कल गावडे, तलाठी भालेराव यांच्यासह महसूल, कृषीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.