श्रीरामपुरात ब्युटीपार्लरवर दगडफेक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपुर येथील निवारा हाउसिंग सोसायटीच्या परिसरातील एका ब्युटी पार्लरवर पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी हल्ला चढवत काचा फोडल्या. याप्रकरणी रात्री उशिरापयंर्त गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


निवारा हाउसिंग सोसायटीमध्ये असलेल्या एका ब्युटी पार्लरमध्ये आलेल्या एका महिलेचा पल्सरवरील तिघांनी पाठलाग केला. ही महिला ब्युटी पार्लरमध्ये गेल्यानंतर हे तिघे खाली उतरून पार्लरजवळ आले. त्यांनी पार्लरची समोरची काच दगडाने फोडली; मात्र तिचा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक गोळा झाल्याने या तरुणांनी येथून पळ काढला व ते नॉर्दन ब्रँचच्या दिशेने पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी रात्री उशिरापयंर्त गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.