विजेच्या धक्क्याने विक्रेत्याचा मृत्यू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :गांधी मैदानात गणेशमूर्ती विक्रीचा स्टॉल चालविणारे लक्ष्मण अरविंद श्रीगादी (रा. दातरंगे मळा, अ.नगर) यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल. ही घटना शुक्रवारी (दि. २५) रात्री ८ वा. घडली. 


मयत श्रीगादी यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी गांधीमैदानात गणपती मूर्ती विक्रीचा स्टॉल लावला होता. शुक्रवारी रात्री लाईट चालू करण्यासाठी श्रीगादी हे स्टॉलच्या मागे गेले असता तेथे उघड्या वायरवर त्यांचा पाय पडल्याने विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.